ग्राहक पंचायत शाखेची रत्नागिरीतील स्थापना सभा लांबणीवर

रत्नागिरी : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीची रत्नागिरी जिल्हा शाखा स्थान करण्याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील समविचारी कार्यकर्त्यांची एक विशेष सभा येत्या शनिवारी (दि. १५ ऑक्टोबर) रत्नागिरीत होणार असलेली नियोजित सभा लांबवणीवर टाकण्यात आली आहे.

ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तरीही ग्राहकाची विविध प्रकारे फसवणूक आणि अडवणूक होत आहे. ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन आणि ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेली ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये ग्राहक जागृतीचे कार्य करीत आहे. कोकण विभागासह रत्नागिरी जिल्ह्यात ही चळवळ पोहोचविण्याच्या दृष्टीने रत्नागिरीत सभेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा आता लांबणीवर टाकण्यात आली आहे. दिवाळीनंतर ही सभा होईल, असे संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी कळविले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी विलास प. घाडीगावकर (७७६७०४०७६०) यांच्याशी संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply