भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचा रत्नागिरीत भाजपतर्फे जल्लोष

रत्नागिरी : जी-20 समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळाल्याबद्दल रत्नागिरीत भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आंतरराष्ट्रीय वीस देशांचे नेतृत्व करणार आहे. ही भारतासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे, हे लक्षात घेता भारतात सर्वत्र या गोष्टीचे कौतुक होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करीत आहे.

रत्नागिरीत नाचणे येथे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. अंजली साळवी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. ७ विश्वनगर येथे कार्यक्रम घेण्यात आला. सर्व महिला पारंपरिक वेषात उपस्थित होत्या. रांगोळी काढून भारताचे कौतुक करण्यात आले. उपस्थितांना मकर संक्रांतीचे औचित्य साधून तिळगूळ देण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार, सरचिटणीस शिल्पा मराठे, तालुकाध्यक्षा तनया शिवलकर, उपाध्यक्ष स्नेहा जोशी, सौ. प्राजक्ता रुमडे, सायली बेर्डे, शोभा जिरोळे, राजीव कीर, नीलेश आखाडे, भाई जठार आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. राजीव कीर यांनी उपस्थितांना जी-20 बद्दल माहिती सांगून संर्वानी सरकारचे उपक्रम तळागाळापर्यंत राबविण्यासाठी कटिबद्ध होण्यासाठी आवाहन केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply