मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघाने मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणानुसार कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, महानुभावांपासून ते अगदी अलीकडच्या सोशल मीडिया युगापर्यंत मराठी परंपरांचा एक दीर्घ वारसा आहे. देशी आणि परदेशी भाषांचे आक्रमण होऊनही मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत असताना, जगाच्या व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि शिक्षणामुळे मराठी माणसांसमोर भविष्याविषयी चिंता व्यक्त करणारे बरेच प्रश्न सध्या उभे राहिले आहेत. ते योग्य की अयोग्य याची चर्चा व्हावी, या हेतूने वृत्तपत्र चळवळीचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या तसेच जागतिकीकरण आणि मराठी भाषा या दोन विषयांवर शाखाप्रमुख संजय भगत पुरस्कृत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
लेखाची शब्दमर्यादा १२०० असून इच्छुकांनी युनिकोड मराठीमध्ये टाईप करून लेख rajandesai759@gmail.com या मेलवर पाठवावेत. रोख पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असून लेख २० फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत. पारितोषिक वितरण समारंभ २६ फेब्रुवारी रोजी दादर येथील सार्वजनिक वाचनालयाच्या धुरू हॉलमधअये मराठी भाषा दिवस कार्यक्रमात होईल, अशी माहिती प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी राजन देसाई (८७७९९८३३९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

