एका महिन्यात सुरू केला बुकगंगाचा व्यवसाय : मंदार जोगळेकर

रत्नागिरी : व्यवसाय करायचे ठरविल्यानंतर अवघ्या एका महिन्यात बुकगंगाचा व्यवसाय सुरू केला. काहीतरी वेगळे करायचे विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक ठरविले, तर त्यात यश येऊ शकते, असा कानमंत्र बुकगंगाचे व्यवस्थापकीय संचालक मंदार जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

रत्नागिरी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे युथ समिट अजेंडा टू ट्रान्सफॉर्म कोकण विद्यार्थी संमेलन उत्साहात पार पडले. त्यावेळी स्टार्ट अप या विषयावर श्री. जोगळेकर यांनी अनुभव कथन केले. बरेच जण शिकून काही करता येईल असे म्हणतात, परंतु त्यातून खरोखरच काही निष्पत्ती होत नाही, असे का, या त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी एका महिन्यात बुकगंगाची निर्मिती करायला कशी सुरुवात केली, त्यातून वेगवेगळी पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करून पुस्तकांचे भव्य दालन सर्वांना कसे खुले केले, याची माहिती दिली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन आणि कार्यक्रमाच्या स्वागत समिती अध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, अभाविप कोकण प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, अभाविप राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते.

अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अनेक जिल्ह्यांत अशी संमेलन पार पडत आहेत. विद्यार्थी परिषद ही एकमेव विद्यार्थी संघटना ७५ वर्षांपासून अविरतपणे आपले कार्य करत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

चितळे उद्योग समूहाचे विश्वास चितळे यांनी कोकणातील व्यावसायिकता आणि त्यांच्या संधी कशा मिळवता येतील, या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. कोकणातील अर्थव्यवस्थेचे माध्यम शेती या विषयावर रूपेश चंदनशिव आणि लोकशाहीतील युवकांचे स्थान या विषयावर कु. अंकिता पवार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी अभाविप कोकण प्रदेश सहमंत्री राहुल राजौरिया, अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवाजी भावसार, अवधूत कोटकर, जिल्हा सहप्रमुख प्रा. प्रभात कोकजे, जिल्हा संयोजक अनुष्का राणे, जिल्हा संमेलनप्रमुख प्रसाद जांगळे उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply