अंगणवाडीच्या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांकरिता आठ अंगणवाडी सेविका आणि २७ अंगणवाडी मदतनिसांची नियुक्ती करायची आहे. त्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत ही पदे भरावयाची असून त्याकरिता उमेदवारांनी २३ मार्चपर्यंत अर्ज पाठवावेत. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्वीकारले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अपूर्ण अर्जांबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.

अंगणवाडी सेविकांची पदे भरायची ठिकाणे अशी : खानू बौद्धवाडी, दांडेआडोम वरचीवाडी, मिरजोळे कृष्णनगर, मिरजोळे जांभुळफाटा, कारवांचीवाडी आदर्श वसाहत, चांदेराई इब्राहिमपटटण, डुगवे.

अंगणवाडी मदतनिसांची पदे खालील ठिकाणी भरायची आहेत : खानू कातळवाडी, पाली पाथरट, वेळवंड गावडेवाडी, वेळवंड बौद्धवाडी, सोमेश्वर उर्दू, हरचिरी मांडवकरवाडी, कोळंबे वाकीवाडी, पूर्णगड खारवीवाडा, शिवारआंबेरे, दांडेआडोम वरचीवाडी, कर्ला नवीन मोहल्ला, नाचणे विनम्रनगर, निवळी बाईतवाडी, भोके मायंगडेवाडी, खेडशी ग्रामपंचायत, गोळप शिरंबाड, नाखरे उंबरवाडी, निरूळ ठिकवाडी, निरूळ क्र.१, शीळ, झाडगाव एमआयडीसी, झाडगाव फगरवठार, कुवारबाव उत्कर्षनगर २, कुवारबाव पाटबंधारे, कुरतडे शिंदेवाडी, टेंभ्ये क्र. १, खेडशी भवानीनगर.

अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायतच नव्हे, तर महसुली गाव, वाडी, वस्ती पाडे येथील रहिवासी असणे आवश्यक आहे. या सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान १८ आणि कमाल ३५ वर्षे अशी राहील. विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० राहील. विधवा /अनाथ असल्याबाबत दाखला जोडावा. उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये असावीत. जातीचा दाखला आवश्यक असून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव दाखला, शासकीय मान्यता संस्थेची संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद बंगला, एकता मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी या पत्त्यावर अर्ज करावेत. आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी पावणेदहा ते सायकाळी सव्वासहा या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply