भिडे चॅरिटेबल ट्रस्टची रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाला तीन लाखांची देणगी

रत्नागिरी : भिडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पटवर्धन आणि कार्यवाह शेखर पटवर्धन यांनी रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाला तीन लाखाची देणगी दिली.

वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या ग्रंथालय सेवा कार्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून तीन लाखाची ही देणगी ॲड. पटवर्धन यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली. डॉ. मिलिंद पटवर्धन या वाचनालयाचे जुने वाचक आहेत. वाचनालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात देणगीचा चेक प्रदान करण्यात आला.

यावेळी डॉ. पटवर्धन म्हणाले, दुर्मिळ पुस्तके सहजपणे मिळण्याचे हक्काचे ठिकाण असलेले जिल्हा नगर वाचनालय अत्यंत नेटकेपणाने विकसित केले आहे. तब्बल १९५ वर्षांची परंपरा आणि एक लाख ११ हजारांची ग्रंथसंपदा हे वाचनालयाचे वैभव आहे. या वाचनालयाला देणगी देताना खूप समाधान होते. उचित कामासाठी दिलेला औचित्यपूर्ण दिवशी देता आला याचा आनंद होतो.

यावेळी चंद्रशेखर पटवर्धन, आनंद पाटणकर, सौ. मालती खवळे हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. ॲड. दीपक पटवर्धन यांनी भिडे चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. पटवर्धन आणि शेखर पटवर्धन यांना देणगीबद्दल धन्यवाद दिले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply