देवरूख येथे आमदार चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : देवरूख येथे येत्या २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आमदार चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा होणार आहेत.

राज्य कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली असून पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी दिली. देवरूखच्या मराठा भवनात या स्पर्धा होणार आहेत.

खेळाडूंनी आपली नावे मिलिंद साप्ते यांच्याकडे १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदवायची आहेत. स्पर्धेसाठी एकूण १ लाख १० हजाराची पारितोषिके व चषक दिले जाणार आहेत. राज्यभरात सुमारे २५० कॅरमपटू त्यात सहभागी होतील. त्यामध्ये विश्वविजेता प्रशांत मोरे, संदीप दिवे, योगेश परदेशी, देवरूखचा कॅरमपटू सार्क विजेता संदीप देवरूखकर, राजन कुमारी, संगीता चांदोरकर, अंबिका हेरद, अनुपमा केदार, रत्नागिरीची आकांक्षा कदम, रियाज अकबर अली, राहुल भस्मे यांचा खेळ पाहायला मिळणार आहे.

जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदीप भाटकर, सुरेंद्र देसाई, मिलिंद साप्ते, नितीन लिमये, मंदार दळवी, मोहन हजारे यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply