रत्नागिरी : सोमेश्वर (ता. रत्नागिरी) येथील शांतीपीठ विश्व मंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्राच्या वास्तूचे भूमिपूजन विधिपूर्वक झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सोमेश्वर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हणून केली. अतिशय मंगलमय वातावरणात अनेक कुटुंबांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. गोमातेचे महत्त्व वैभवजी चव्हाण आणि श्रीकांत ढालकर यांनी सांगितले. आकाश शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. भूमिपूजन आणि गायत्री मंत्राचा जप झाला. अनेक कुटुंबे गायत्री मंत्राचा जप करत यज्ञामध्ये सहभागी झाली होती. गोमातेसाठी अनेकांनी विविध प्रकारचे सहकार्य करण्याचा संकल्प केला. जमीन मालक शशिकांत सोवनी यांचा सोवनी कुटुंबीयांचे प्रतिनिधी म्हणून सोमेश्वर शांतीपीठाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. राजेश आयरे यांनी सोमेश्वर शांती पीठामार्फत विविध प्रकारचे जे उपक्रम पुढील कालखंडामध्ये योजले जाणार आहेत त्याविषयी माहिती दिली. योगाश्रम, निसर्गोपचार केंद्र, वनौषधी लागवड, आनंदाश्रम इत्यादी विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. दाते काका, इनामदार सर, अनुजाताई पेठकर, विनोद पेठकर, छायाताई अणावकर, राकेश वाघ, संतोष पावरी, अशोक पाटील सर, अमोल चाटे, देवेंद्र झापडेकर, राकेश नलावडे, दीपकजी देवल, मरुधर समाजातील कार्यकर्ते व पाटीदार समाज बांधव, पतंजलीचे कार्यकर्ते, रोटरी क्लबचे कार्यकर्ते, सोमेश्वर मंदिर ट्रस्टी व ग्रामस्थ, रत्नागिरीतील गोभक्त यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला प्रकाश गुडे, विकास मयेकर, जितेंद्र भोगले, मुन्ना पिलणकर, अमर पिलणकर हे भैरी मंदिराचे ट्रस्टी, प्रभाकर खानविलकर, शरद कोतवडेकर, दत्तात्रय शेलार, बाबाशेठ नाचणकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीकांत भुर्के, धरमसीभाई चौहान, सचिन शिंदे, विनायक हातखंबकर, प्रमोद कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार खंडकर, दादा ढेकणे, ज्ञानेश पोतकर, भडकमकर, संतोष बोरकर, अमर कीर, अनिरुद्ध फळणीकर, ऋषिकेश केळकर, नीलेश आखाडे, सचिन गांधी, अनिष पटवर्धन, राजन महाकाळ,
सोमेश्वरच्या सरपंच नाझिया मुकादम, उपसरपंच उत्तम नागवेकर, तलाठी श्री. पांचाळ,
कुवारबावच्या सरपंच मंजिरी पाडळकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राकेश नलावडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आप्पा बापट, अप्पा साठे, कौस्तुभ सावंत, पुराणिकस तनयाताई शिवलकर, अमृता मिरकर, उदयकुमार मिरकर, प्रमिला पुसाळकर, सुनीता भावे, तीर्था कीर, रश्मी खोत, नेहा बोरकर, प्रभाकर खानविलकर, प्रतिभा मयेकर, प्रणया हरचिरकर, रेश्मा पवार, सुकांता जाधव, निशिगंधा घाटविलकर, भरत इदाते, संजय अहिरे, मिलिंद करंजवकर, तुषार देसाई, दीपक मयेकर, सुनील मुळे, शिरीष सावंत, साईजित शिवलकर, निशिता शिवलकर, पांडुरंग केळकर, मोहन पटवर्धन, सुरेखा लिमये, अमित काटे असे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ढोलताशाच्या गजरामध्ये पुण्यातील कार्यकर्त्यांचे स्वागत व अतिथींचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर प्रमुख कार्यकर्त्यांच्या गटांचे स्वागत व त्यांच्या हस्ते गुणवान विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण झाले. कार्यक्रमाची सांगता स्वरा व मृण्मयी आयरे यांनी गोभक्तीवर आधारित गीत गायनाने केली.



