रोटरी क्लबतर्फे रत्नागिरीत जयपूर फूट शिबिर

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे जयपूर फूट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याकरिता १० मार्चपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुर्धर आजार किंवा अकस्मात अपघाताने अपंगत्व आलेल्या अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. दैनंदिन जीवनातील कामेदेखील त्यांच्यासाठी असह्य होऊन बसतात. अपंगत्वामुळे येणाऱ्या अडचणी भरपूर आहेत सगळ्याच गरजा कृत्रिम अवयवांनी पूर्ण करता येत नाहीत. पण लाभाकर्त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, अशी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांची इच्छा आहे. अशाच गरजू व्यक्तींना कमीत कमी दैनंदिन कामे करता यावीत, यासाठी जयपूर फूट – कृत्रिम अवयव प्रत्यारोपण उपक्रम रोटरी क्लबने आयोजित करायचे ठरविले आहे.

हे शिबिर मार्च महिन्यातच होणार असून शिबिराची तारीख १७ मार्चनंतर कळविण्यात येणार आहे. त्यासाठी १० मार्चपर्यंत नावनोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जयपूर फूट शिबिराच्या प्रमुख वेदा मुकादम (९९२३९९३१९९) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply