चिरंजीव गीतरामायणाची पुनरानुभूती
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव होणार आहे. या महोत्सवात चिरंजीव गीतरामायणाचा आविष्कार घडविला जाणार आहे. त्यानिमित्ताने गीतरामायणाविषयी.
नमस्कार, जय श्रीराम!
यावर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अंतर्भाव असणारे गीतरामायण….. ६९ वर्षे झाली, तरी मराठी माणसाच्या मनावरील गीतरामायणाची जादू तसूभरही कमी झालेली नाही… याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे खुद्द गदिमांनीच म्हटल्याप्रमाणे गीतरामायण म्हणजे – “काव्य नव्हे हा अमृतसंचय”. त्यामुळे या अमृताचा आस्वाद गेली ६९ वर्षे मराठी रसिक भरभरून घेत आहे.
एकूण ७ कांडे, ६४५ सर्ग आणि २४ हजार ३३५ श्लोक असा विस्तार असलेल्या वाल्मीकी रामायणाला गदिमांनी अवघ्या ५६ गीतांमध्ये आपल्यापुढे समूर्त केले.
पं. शंकर अभ्यंकर यांनी, गीतरामायणाचे रामायण या आनंद माडगूळकर यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे –
“गीतरामायण म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचा झगमगता कौस्तुभ मणी आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा अमृतसोहळा आहे. अजर, अमर, अक्षय, अक्षुण्ण! ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, अशी मिरासदारी सांगणाऱ्या गदिमांची रससिद्ध प्रज्ञा आणि ‘लय ही रखुमाई, स्वर हाच विठोबा’ असलेल्या सुधीर फडकेंची सांगीतिक प्रतिभा यांच्या मनोज्ञ संगमातून गीतरामायणाचा अवतार झाला आहे. सात दशकांनंतर ही तो टवटवीत आहे कारण अवतार चिरंजीव असतो.”
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या गीतरामायणातील गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेत दत्तो वामन पोतदार लिहितात –
“माडगूळकरांचे गीतरामायण सुधीर फडके यांच्या सुस्वर कंठातून आकाशवाणीवरून बाहेर पडताच गीतरामायणाने महाराष्ट्र कोंदून गेला आहे. ते त्यांचे अनुरूप शब्द, त्या गीतांच्या मधुर चाली, त्यातील प्रसंगानुकूल भावाविष्कार अशी सर्वांगसंपन्नता दृष्टीस पडताच मी सहज बोलून गेलो की माडगूळकर हे यथार्थाने ‘आधुनिक वाल्मीकी’ शोभतात.”
अर्थात अशा गीतरामायणाची मोहिनी रसिक मराठी जनांना न पडती तरच नवल. पण माडगूळकर मात्र याचे श्रेय स्वतःकडे न घेता त्यांच्या काव्यमय मनोगतात म्हणतात –
“चंद्रभारल्या जीवाला नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड”
गदिमांचा हा विनय लक्षात घेऊनसुद्धा मराठी माणसाने त्यांच्यावर अपार प्रेम केले आणि हे गीतरामायण ज्यांच्या कंठातून आणि संगीताने अवघ्या रसिकांपर्यंत पोहोचले, त्या बाबूजींवरसुद्धा….
त्यामुळे कीर्तनसंध्यावर प्रेम करणाऱ्या तमाम कीर्तनप्रेमी श्रोत्यांना यंदा आफळेबुवांच्या रामकथेबरोबरच कीर्तनसंध्येमध्ये गीतरामायणाचाही आस्वाद घेता येणार आहे.
यंदा कीर्तनसंध्येचा विषय आहे – ‘आले रामराज्य’
“रामराज्य या असता भूवर
कलंक केवल चंद्रकलेवर
कज्जलरेखित स्त्री नयनांवर
विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार”
याच सत्य आणि सुंदर विचारांनी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभे राहिले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. आले रामराज्य!
पुढच्या भागात या लेखमालेचा समारोप करू …
- निबंध कानिटकर, संगमेश्वर
(संपर्क : ९४२२३७६३२७) - ……
प्रवेशिकांविषयी …
कीर्तनसंध्येसाठी भारतीय बैठक मोफत असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील.
कीर्तनसंध्या २०२४ देणगी सन्मानिका मिळण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे
मानस जनरल स्टोअर्स, माळनाका, रत्नागिरी
९०११६६२२२०
धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय, मारुती, मंदिर, रत्नागिरी
उमेश आंबर्डेकर – ९४२३२९२४३७
सोहम एन्टरप्रायझेस, माळनाका, रत्नागिरी
नितीन नाफड – ८३०८८१३१५८
गुरुकृपा रेडिओ हाउस, टिळक आळी, रत्नागिरी
९८९०८२७००६
आगाशे स्टोअर्स आणि आगाशे फूडकोर्ट, साळवी स्टॉप, रत्नागिरी
९७३०३१०७९९
श्रीकांत सरदेसाई, रत्नागिरी
९४२११४२४९८
श्रीराम गोडबोले, पावस
९४२१२३८८२४
मकरंद करंदीकर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी
९२८४७६७३७६
रत्नाकर जोशी, डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद बस स्टॉपजवळ,
मेन रोड, रत्नागिरी
९४२२०५२६१३
अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी
अनिकेत कोनकर – ९४२३२९२१६२
महेंद्र दांडेकर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी
७४१०१०४४३३
पराग गोगटे, केशर अमृततुल्य, जयस्तंभ, रत्नागिरी
९५५२५७०७२४
केळकर उपाहारगृह, अंगण प्लाझा, नाचणे रोड
९४२३०४७३४७
मधुसूदन बेंडे
९४२३८१७५११
राजन पटवर्धन, विष्णुनगर, नाचणे रोड, रत्नागिरी
९८६०३६६९९१
गंधराज ,समीर कार्लेकर, मारुती आळी, रत्नागिरी
९७६९२८७१७१
चिन्मय भागवत, नाचणे, रत्नागिरी
८८८८७९८८४५
श्रीनंदन केळकर, पऱ्ह्याची आळी, रत्नागिरी
७०८३९०९१०९
निबंध कानिटकर, कसबा, संगमेश्वर
९४२२३७६३२७
ओमकार बापट, रत्नागिरी
९४२२४३२७६४
…….
याशिवाय समर्पण अॅपवरूनही प्रवेशिका उपलब्ध आहेत. समर्पण अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक –
https://scan.samarpanpay.com/home/kirtansandhyaratnagiri
सोबतचा कोड स्कॅन करूनही देणगी प्रवेशिका उपलब्ध होऊ शकेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

