स्वरूपानंदांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त २७ पासून व्याख्यानमाला

रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंदांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त वर्षभर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तिचा प्रारंभ २७ जुलै रोजी होईल.

शहरातील वरची आळी येथील स्वामींच्या अध्यात्म मंदिरात ही व्याख्यानमाला होणार आहे. स्वामींनी रचलेल्या अभंगांवर व्याख्यानमाला होईल. ही सर्व व्याख्याने सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत होणार आहेत. व्याख्यानमालेची सुरवात येत्या शनिवारी (दि. २७ जुलै) २८ जुलै रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख व व्यासंगी डॉ. कल्पना आठल्ये यांच्या प्रवचनांनी होणार आहे. या कार्यक्रमात स्वामी स्वरूपानंदांच्या रचना संगीतकार विजय रानडे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगांचे सादरीकरण होईल. त्याच अभंगांवर प्रवचन होईल.

त्यानंतर दर महिन्याला व्याख्याने होणार आहेत. येत्या १३ ऑगस्ट रोजी निवृत्त प्राध्यापिका अंजली बर्वे, १४ ऑगस्ट रोजी शिक्षण तज्ज्ञ रेणू दांडेकर यांची प्रवचने होतील. स्वामी स्वरूपानंद यांच्या तारखेनुसार पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील संत वाङ्मयाचे अभ्यासक प्रणव गोखले व्याख्यान देणार आहेत.

या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply