‘शब्दांकुर’ हस्तलिखितासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे यावर्षीही ‘शब्दांकुर’ हस्तलिखित साकारण्यात येत आहे. त्याकरिता साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

साहित्य आणि वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी सात्यत्याने जनसेवा ग्रंथालय उपक्रमशील असते. हस्तलिखित अंक हा त्याचाच भाग आहे. या हस्तलिखितात नवोदित लेखकांच्या साहित्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

लेखकांनी पाठविलेल्या कथा, कविता, वैचारिक, ललित, सामाजिक लेख, प्रवासवर्णन, बोलीभाषांमधील साहित्य, जन्मशताब्दी मान्यवरांसंबधी लेख, बालसाहित्य, मुलाखती आदी साहित्याने परिपूर्ण असे हे हस्तलिखित असणार असेल. दिवाळीत या अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कोकणातील नवोदित लेखकांकडून या हस्तलिखित परंपरेच्या जोपासनेला हातभार लागावा, या हेतून साहित्य मागविण्यात येत आहे.

लेखकांनी आपले साहित्य २० सप्टेंबरपर्यंत जनसेवा ग्रंथालय, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक, रत्नागिरी-४१५६१२ या पत्त्यावर टपालाने पाठवावे किंवा amolpalye@gmail.com यावर ईमेल करावे. सहभागी लेखकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती जनसेवा ग्रंथालयातर्फे देण्यात आली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply