रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शनिवारी, दि. १७ मे रोजी जी एच रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा ९ व १५ वर्षाखालील गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केली असून ती रा. भा. शिर्के प्रशालेत होईल. सर्व खेळाडूंनी स्पर्धास्थानी सकाळी ठीक १० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके दिली जाणार आहेत. ९ वर्षांखालील खुला गट व मुलींचा गट प्रत्येकी प्रथम ४०० रुपये, द्वितीय ३०० रुपये आणि चषक.
१५ वर्षांखालील खुला गट व मुलींचा गट प्रत्येकी
प्रथम ४०० रुपये, द्वितीय ३०० रुपये, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी २०० रुपये आणि चषक
उत्तेजनार्थ ११, १२ आणि १३ वर्षांखालील मुले व मुली यांच्या वयोगटात प्रत्येकी १ चषक दिला जाईल.
९ वर्षांखालील स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील १.१.२०१६ नंतर जन्मलेले व १५ वर्षांखालील स्पर्धेत १.१.२०१० पासूनची जन्मतारीख असलेले सर्व खेळाडू सहभागी होऊ शकतात.
स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळवली जाईल. एकूण फेऱ्यांची संख्या स्पर्धकांच्या सहभागावर ठरविण्यात येईल. ९ वर्षांखालील गटात २ मुले व २ मुली व १५ वर्षांखालील गटात ४ मुले व ४ मुली यांची निवड राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी करण्यात येईल. निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्यास त्यांच्या प्रवेश शुल्काचा परतावा जिल्हा संघटनेमार्फत दिला जाईल. तेथील राहण्याची व्यवस्था डॉर्मिटरी स्वरूपात राज्य निवड स्पर्धेचे आयोजक मोफत करतील.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क १०० रुपये आहे. आयत्या वेळी प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. नाव नोंदविण्याकरीता स्पर्धेच्या आदल्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंतच खाली नमूद केलेल्या फोन नंबरपैकी एकाला Gpay करून मग खालील लिंकवर फॉर्म भरणे आवश्यक आहे : https://forms.gle/uhhCcaP8LxTLCjtV7
जिल्हा निवड स्पर्धा खेळण्याकरिता महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे वार्षिक रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. जे या वर्षी प्रथमच जिल्हा निवड स्पर्धा खेळत आहेत, अशांनी पुढील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. ज्यांनी गेल्या वर्षी हे रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी फक्त वार्षिक शुल्क भरून त्याचे नूतनीकरण करणे अपेक्षित आहे.
नवीन खेळाडूंसाठी MCA रजिस्ट्रेशन लिंक :
https://mcachess.in/Tournament_Registration/MCA_Registrations.php
आधीच रजिस्ट्रेशन करून झालेल्या खेळाडूचे नाव व MCA ID शोधण्यासाठीची लिंक :
https://mcachess.in/Tournament_Registration/all_player_list.php
मागील स्पर्धांमध्ये ज्यांचे रजिस्ट्रेशन करून झाले आहे अशा खेळाडूंकरीता MCA रिन्युअल लिंक :
https://mcachess.in/Tournament_Registration/existing_entry.php
Gpay व अधिक माहितीसाठी : विवेक सोहनी (९४२२४७४५४६), चैतन्य भिडे (८०८७२२००६७), मंगेश मोडक (९४०५३५२३५६) यांच्याशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

