रत्नागिरीत रविवारी खुला आणि महिला गट बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या रविवारी, दि. १८ मे रोजी जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा खुल्या आणि महिला गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा रत्नागिरीत रा. भा. शिर्के प्रशालेत होईल. सर्व खेळाडूंनी स्पर्धास्थानी सकाळी ठीक १० वाजता उपस्थित राहावे, असे सूचित करण्यात आले आहे.

खुल्या आणि महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे १०००, ७००, ६०० आणि ५०० रुपये रोख आणि चषक दिला जाणील. याशिवाय ११, १३, १५ वर्षांखालील मुले व मुली यांच्या वयोगटात तसेच सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडूंना प्रत्येकी १ चषक उत्तेजनार्थ म्हणून दिला जाईल.

स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खेळाडू सहभागी होऊ शकतात. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळवली जाईल. एकूण फेऱ्यांची संख्या स्पर्धकांच्या सहभागावर ठरविण्यात येईल. स्पर्धेतून खुल्या गटातून ४, तर महिला गटातून ४ खेळाडूंची निवड राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी करण्यात येईल. निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्यास त्यांच्या प्रवेश शुल्काचा परतावा जिल्हा संघटनेमार्फत दिला जाईल. तेथील राहण्याची व्यवस्था डॉर्मिटरी स्वरूपात राज्य निवड स्पर्धेचे आयोजक मोफत करतील. स्पर्धेचे प्रवेश शुल्क १०० रुपये आहे. स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता आदल्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंतच सोबत नमूद केलेल्या फोन नंबरपैकी एकाला Gpay करून मग खालील लिंकवर फॉर्म भरणे आवश्यक आहे : https://forms.gle/uhhCcaP8LxTLCjtV7

जिल्हा निवड स्पर्धा खेळण्याकरिता महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे वार्षिक रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. जे या वर्षी प्रथमच जिल्हा निवड स्पर्धा खेळत आहेत, अशांनी पुढील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. ज्यांनी गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांनी फक्त वार्षिक शुल्क भरून त्याचे नूतनीकरणे करणे अपेक्षित आहे.

नवीन खेळाडूंसाठी रजिस्ट्रेशन लिंक अशी :
https://mcachess.in/Tournament_Registration/MCA_Registrations.php

आधीच रजिस्ट्रेशन झालेल्या खेळाडूचे नाव व MCA ID शोधण्यासाठीची लिंक :
https://mcachess.in/Tournament_Registration/all_player_list.php

मागील स्पर्धांमध्ये ज्यांचे रजिस्ट्रेशन करून झाले आहे अशा खेळाडूंकरिता MCA रिन्युअल लिंक :
https://mcachess.in/Tournament_Registration/existing_entry.php

Gpay आणि अधिक माहितीसाठी विवेक सोहनी (९४२२४७४५४६), चैतन्य भिडे (८०८७२२००६७) किंवा मंगेश मोडक (९४०५३५२३५६) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply