अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन धुळप, तनया आंब्रे आणि राघव पाध्ये विजयी

रत्नागिरी : अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन धुळप, तनया आंब्रे आणि राघव पाध्ये विविध गटांमध्ये विजयी झाले.

स्पर्धेत विविध गटांतील खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सादर करत रोख रक्कम व चषक मिळवले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रा. भा. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, ज्येष्ठ पत्रकार व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मकरंद पटवर्धन उपस्थित होते.

आर्यन धुळपने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात, तर मुलींच्या गटात तनया मच्छिंद्र आंब्रे हिने आणि राघव पाध्ये याने ११ वर्षांखालील गटात अपराजित राहून स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

स्पर्धेचा निकाल असा – १७ वर्षाखालील खुला गट – आर्यन धुळप, रुमिन वस्ता, उत्तेजनार्थ : अपूर्व बंडसोडे, मोहित टिकेकर, आयुष रायकर

१७ वर्षांखालील मुली: तनया मच्छिंद्र आंब्रे, आर्या नितीन पळसुलेदेसाई, उत्तेजनार्थ : खुशी सावंत, सानवी दामले, रमा कानविंदे

११ वर्षांखाली खुला गट : राघव पाध्ये, विहंग सावंत, उत्तेजनार्थ : आरव निमकर

या स्पर्धेद्वारे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले असून, पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आयोजकांनी स्पर्धेसाठी सर्व खेळाडू व पालकांचे आभार मानले. स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्य निवड स्पर्धेत करणार असून पुढे होणाऱ्या राज्य निवड स्पर्धेसाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कानविंदे कुटुंबीय, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, शिर्के प्रशालेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

रायसोनी फौंडेशनकडून स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आले होते. विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी पंच म्हणून काम पहिले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply