करोनाचे रत्नागिरीत १४, तर सिंधुदुर्गात २५ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (४ डिसेंबर) १४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर २८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (चार डिसेंबर) करोनाचे नवे १४ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८८६४ झाली आहे. आज तपासलेल्या अन्य १५७ जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर १३.८० टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ७, गुहागर २, संगमेश्वर २ (एकूण ११); रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी १, खेड २ (एकूण ३), दोन्ही मिळून १४

जिल्ह्यात आज २८ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८३५१ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.२१ टक्के आहे. सध्या १४४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४५ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३२१ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६२ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (चार डिसेंबर) २५ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५३७६ झाली आहे. सध्या २६३ जण उपचारांखाली आहेत. आज १८ जण करोनामुक्त झाले असून, जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ४९६२ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply