रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१३ डिसेंबर) ८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १२ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ डिसेंबर) करोनाचे नवे आठ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८९६० झाली आहे. आज तपासलेल्या अन्य १५३ जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर १३.६१ टक्के आहे.
आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ३, खेड १, चिपळूण १ (एकूण ५); रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली १, खेड १, संगमेश्वर १ (एकूण ३) ; दोन्ही मिळून ८
जिल्ह्यात आज १६ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८४९५ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.८१ टक्के आहे. सध्या ९७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३७ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३२२ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.५९ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१३ डिसेंबर) २१ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५५९२ झाली आहे. सध्या ३५० जण उपचारांखाली आहेत. आज १२ जण करोनामुक्त झाले असून, जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ५०८६ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

