रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १३, तर सिंधुदुर्गात ९ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (रविवारी) करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले, तर ९ रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. सिंधुदुर्गात नव्या ९ करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार ६ (रत्नागिरी ३, संगमेश्वर १, राजापूर २) तर अँटिजेन चाचणीनुसार ७ (दापोली १ आणि गुहागर ६) असे दोन्ही चाचण्या मिळून एकूण १३ रुग्ण आढळले. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या ९१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ४३ जणांचा समावेश आहे, तर सर्वाधिक २४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार ५६ झाली आहे. आज चाचणी घेतलेल्या आणखी ९५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत चाचणी घेतलेल्या ५७ हजार ९३९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आज ९ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यांच्यासह आतापर्यंत एकूण आठ हजार ५९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आज दाखल झालेल्या रुग्णांच्या तुलनेत घरी गेलेल्यांची संख्या कमी झाल्याने करोनामुक्तीचे प्रमाण आजही घटले असून ते आता ९४.८८ टक्के झाले आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३२७ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६१ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ९ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ७४७ झाली आहे. सध्या सक्रिय असलेले ३७० रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांखाली आहेत. आज एकही रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी जाऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार २२० आहे. आतापर्यंत दुर्दैवाने १५१ जणांचा मृत्यू झाला.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply