रत्नागिरीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी करोनाचे १८, सिंधुदुर्गात ५ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर कालच्याप्रमाणेच ११ जणांना बरे वाटल्याने सुट्टी देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि २६ जण बरे वाटल्याने घरी गेले.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत दोघे रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ८, दापोलीत १, खेडमध्ये ४, चिपळूणला १ आणि लांज्यात दोघे रुग्ण बाधित आढळले. एकूण १८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या १५१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ७१ जण आहेत, तर सर्वाधिक ४४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार १४८ झाली आहे.

आज चाचणी घेतलेल्या आणखी २७५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्ह्यात आज ११ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ६३३ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९४.३७ टक्के आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२७ एवढीच आहे. मृत्युदर ३.५७ टक्के आहे.

आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३२७ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.५८ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ५ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ८११ झाली आहे. सध्या ३१५ रुग्ण सक्रिय आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार ३३९ झाली आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply