रत्नागिरीच्या स्टेट बँक कॉलनीत वायफायच्या रूपाने अटलजी घराघरात

रत्नागिरी : दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात पहिल्या वायफाय झोनचे उद्घाटन आज (शुक्रवारी) करण्यात आले. अटल वायफाय झोन असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे रत्नागिरी शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांच्या संकल्पनेतून ही सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे स्टेट बँक कॉलनी परिसरातील नागरिकांना इंटरनेटची मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध होणार आहे.

या वायफाय सेवेचे उद्घाटन दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे वायफाय सेवा सुरू करून त्यांचे नाव परिसरातील अक्षरशः घराघरात पोहोचले आहे. वाजपेयी यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार श्री. पटवर्धन यांनी यावेळी काढले.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, शहराध्यक्ष सचिन करमरकर, अॅड. बाबा परुळेकर, विक्रम जैन, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, नगरसेवक उमेश कुलकर्णी, संपदा तळेकर, सौ. पाटील, प्रशांत डिंगणकर, संकेत बापट, पमू पाटील, सौ. मानसी करमरकर, संदीप सुर्वे, मनोज पाटणकर, शैलेश बेर्डे, प्राजक्ता रूमडे, स्थानिक रहिवासी दत्तात्रय मराठे, बोरकर, राजू मोरे, बिपीन शिवलकर, करंबेळकर, निंबाळकर, चाळके, सावंत, डॉ. रेणुसे, मयूर जाधव, अमेय रायकर, मंदार खंडकर, मंदार लेले आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply