रत्नागिरीत १९, सिंधुदुर्गात करोनाचे नवे २५ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (मंगळवारी) १९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. दोन्ही जिल्ह्यांत नव्या मृत्यूंची नोंद आज झाली नाही.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि राजापूरमध्ये प्रत्येकी २, तर संगमेश्वरमध्ये ६ रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन चाचणीत गुहागर आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी एक, तर रत्नागिरीत ७ रुग्ण बाधित आढळले. एकूण रुग्णांची संख्या आता नऊ हजार २६६ झाली आहे.

आज आणखी १४७ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६० हजार ७७५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज १० जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ८१२ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९५.१० टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत एकही करोनाबाधित रुग्ण करोनामुक्त झाला नाही. त्यामुले आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५३६ एवढीच आहे. सध्या जिल्ह्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ९३३ एवढी झाली आहे. आज तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या १६० एवढी झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply