रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात करोनाचे प्रत्येकी १४ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ मार्च) करोनाचे प्रत्येकी १४ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १० हजार २२२, तर सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या ६५९७ झाली आहे. आज रत्नागिरीत १३ जण, तर सिंधुदुर्गात २६ जण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी तालुक्यात तीन, चिपळूण तालुक्यात सहा, तर लांजा तालुक्यात १ नवा रुग्ण सापडला. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी तालुक्यात तीन, तर खेड तालुक्यात १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १४). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार २२२ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, आतापर्यंत ८८ हजार ३१६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १४५ आहे. त्यातील सर्वाधिक ४६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ५९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १३ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९६७६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता ३७० असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६२ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत २६ आणि आजपर्यंत एकूण ६ हजार २४७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४ व्यक्ती बाधित झाल्याचा तपासणी अहवाल आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. आज १४ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६ हजार ५९७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७७ आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply