रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतीच

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतीच आहे. आज (२९ मार्च) सलग सहाव्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आज नवे ६९ रुग्ण आढळले, तर ४७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज तिघांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात नवे २७ रुग्ण सापडले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी २४, दापोली ४, खेड १, गुहागर ७, चिपळूण १०, संगमेश्वर ६, मंडणगड २ (एकूण ५४). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ५, चिपळूण ७, संगमेश्वर २, मंडणगड १ (एकूण १५). (दोन्ही मिळून ६९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ८४८ झाली आहे. शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढल्याने करोनाविषयक चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. आज एकंदर एक हजार ३०० जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी १२३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९८ हजार ९६९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

शासकीय रुग्णालयात असलेल्या तीन पुरुष रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यातील दापोली तालुक्यातील ६७ वर्षीय रुग्णाचा काल मृत्यू झाला. चिपळूण येथील ५७ वर्षीय आणि राजापूर येथील ६० वर्षीय अशा दोघांचा मृत्यू आज झाला. ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू आज नोंदविला गेला. त्यामुळे मृतांची संख्या ३७५ झाली असून मृत्युदर ३.४५ टक्के झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज (२९ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज
जिल्ह्यात २७ जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७ हजार ३ एवढी झाली आहे. आज २९ जणांना  बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४४३  झाली आहे.  जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची वाढू लागली असून ती ३७२ वर पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १८२ असल्याची  माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply