आरोग्य, संचारबंदीविषयी माहितीसाठी नियंत्रण कक्ष

रत्नागिरी : करोनाच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात आरोग्यविषयक तसेच संचारबंदीविषयक माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सध्या करोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्य तसेच जिल्हास्तरावर करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश कालपासून येत्या ३० एप्रिलपर्यंत लागू करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यविषयक तसेच संचारबंदीविषयक काही अडचण अथवा मार्गदर्शन हवे असल्यास त्यांच्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

माहितीसाठी नियंत्रण कक्षाचे क्रमांक –

आरोग्यविषयक माहिती –

जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, कोव्हिड नियंत्रण कक्ष (०२३५२) २२६०६०.

संचारबंदीविषयक माहिती –

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी (०२३५२) २२६२४८ किंवा २२२२३३.

व्हॉट्स अॅप- ७०५७२२२२३३.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply