सिंधुदुर्गात करोनाचे १७४ रुग्ण, ५५ करोनामुक्त, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे १७४ रुग्ण आढळले, तर ५५ जण करोनामुक्त झाले. आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या १७४ रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ८ हजार ३५८ झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७८३, दोडामार्ग – ४२४, कणकवली – २३६०, कुडाळ – १८०२, मालवण – ८२३, सावंतवाडी – १०९५, वैभववाडी – ३४६, वेंगुर्ले ६७२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ४८.

आज ५५ जण करोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या ६ हजार ८६४ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती एक हजार २९० आहे. सर्वाधिक २४९ सक्रिय रुग्ण देवगड तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – दोडामार्ग ४९, कणकवली २०६, कुडाळ २५७, मालवण १६०, सावंतवाडी १४०, वैभववाडी १२३, वेंगुर्ले ९०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १६.

आज आचरा (मालवण) येथील ५५ वर्षीय पुरुष आणि वैभववाडी येथील ६७ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १९८ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply