रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ मे) नवे ४९९ करोनाबाधित आढळले. आज ३७० जण करोनामुक्त झाले.
जिल्ह्यात आज पुन्हा एकदा मंडणगड वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये करोनाबाधित आढळले. सर्वाधिक १७४ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.
जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८७, गुहागर २१, चिपळूण ३३, संगमेश्वर १६, लांजा २१, राजापूर २१. (एकूण १९९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ८७, दापोली ३२, खेड ६५, गुहागर ३०, चिपळूण ४०, संगमेश्वर ३५, लांजा ७ आणि राजापूर ४. (एकूण ३००). (दोन्ही मिळून ४९९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २३ हजार ३०२ झाली आहे.
रत्नागिरीत नवे ४९९ करोनाबाधित रुग्ण, ३७० करोनामुक्त
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ मे) नवे ४९९ करोनाबाधित आढळले. आज ३७० जण करोनामुक्त झाले.
जिल्ह्यात आज पुन्हा एकदा मंडणगड वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये करोनाबाधित आढळले. सर्वाधिक १७४ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.
जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८७, गुहागर २१, चिपळूण ३३, संगमेश्वर १६, लांजा २१, राजापूर २१. (एकूण १९९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ८७, दापोली ३२, खेड ६५, गुहागर ३०, चिपळूण ४०, संगमेश्वर ३५, लांजा ७ आणि राजापूर ४. (एकूण ३००). (दोन्ही मिळून ४९९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २३ हजार ३०२ झाली आहे.
जिल्ह्यात आज ३७० रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १६ हजार ५ झाली आहे.
जिल्ह्यात आज पूर्वीचे ३ आणि आजचे १७ अशा एकूण २० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या मृत्यूंपैकी १६ जण शासकीय रुग्णालयांत, तर एकाचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६८१ झाली असून मृत्युदर २.९२ टक्के आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १७७, खेड ८३, गुहागर २९, दापोली ६३, चिपळूण १३५, संगमेश्वर ९८, लांजा ३८, राजापूर ५१, मंडणगड ७.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media