रत्नागिरी जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (७ मे) नवे ६६२ करोनाबाधित आढळले, तर त्याहून अधिक म्हणजे ७९६ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १६५, दापोली ३, खेड २९, गुहागर १८, चिपळूण १२४, संगमेश्वर ३७, मंडणगड ५, लांजा ४८ आणि राजापूर ७ (एकूण ४३६), तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ८३, दापोली १८, खेड ४२, गुहागर ३४, चिपळूण ४०, लांजा ७ आणि राजापूर २ (एकूण२२६) (दोन्ही मिळून ६६२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २५ हजार ९०१ झाली आहे. आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार ९३८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ४४ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार २१७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ७९६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या १९ हजार १९० झाली आहे. करोनामुक्तांची ही टक्केवारी ७४.०८ टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ५ आणि आजचे १४ अशा एकूण १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या १४ पैकी एकाचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ७७३ झाली असून मृत्युदर २.९८ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी १९६, खेड ८९, गुहागर ३०, दापोली ७४, चिपळूण १६०, संगमेश्वर ११४, लांजा ४४, राजापूर ५९, मंडणगड ७. (एकूण ७७३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply