रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ४८६ रुग्ण, ३७८ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ मे) करोनाचे नवे ४८६ रुग्ण आढळले. आज ३७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ६५, खेड ३, गुहागर १, चिपळूण ७४, संगमेश्वर २४, मंडणगड ८, लांजा २१ आणि राजापूर ९ (एकूण २०५). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २०, दापोली १. (एकूण ११). (दोन्ही मिळून २२६). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण २६०. (सर्व मिळून ४८६).

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३० हजार ३३६ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ६७१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ९०९ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार २७८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३७८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २४ हजार ७५० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८१.५८ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्या सर्वांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाला आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ९१५ झाली असून मृत्युदर ३.०१ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २५५, खेड १०२, गुहागर ३९, दापोली ८०, चिपळूण १८३, संगमेश्वर १२६, लांजा ५४, राजापूर ६६, मंडणगड १०. (एकूण ९१५).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply