रत्नागिरीत नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३१ मे) करोनाच्या नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढली आहे. नवे ३९५ रुग्ण आढळले, तर ५०३ जण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २७२, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १२३ (दोन्ही मिळून ३९५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३६ हजार ४३९ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ४१७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ३२७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ६९ हजार २१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ५०३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३१ हजार ७८३ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८७.२२ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक ५ मृत्यू रत्नागिरी तालुक्यातील, चिपळूण तालुक्यातील ३, राजापूर तालुक्यातील २, तर संगमेश्वर, लांजा आणि खेड तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आज नोंदविला गेला. त्यातील ८ जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात, तर इतर पाच जणांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार २३९ झाली आहे. मृत्युदर ३.४० टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३६१, खेड १२४, गुहागर ८६, दापोली १०८, चिपळूण २४१, संगमेश्वर १५३, लांजा ६६, राजापूर ८८, मंडणगड १२. (एकूण १२३९).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply