रत्नागिरीत नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (७ जून) करोनाचे नवे ४२९ रुग्ण आढळले, तर ५५२ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. त्यामुळे अनेक दिवसांनी नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या आज वाढली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ३०९, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १२० (दोन्ही मिळून ४२९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४० हजार ६२९ झाली आहे. बाधितांचा जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.८० टक्के आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ४८७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज दोन हजार १४७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८७ हजार ५७५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ५५२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३४ हजार ७६४ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.५६ टक्के आहे.

जिल्ह्यात पूर्वीच्या १३ आणि आजच्या ९ अशा २२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ३७८ झाली आहे. मृत्युदर ३.३९ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४०९, खेड १३४, गुहागर ९६, दापोली १२१, चिपळूण २६९, संगमेश्वर १६७, लांजा ७१, राजापूर ९९, मंडणगड १२. (एकूण १३७८).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply