रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येतील वाढ सुरूच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ जून) करोनाचे नवे ५९२ रुग्ण आढळले, तर ४०९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. नवबाधितांच्या संख्येत आजही पुन्हा वाढ झाली आहे. आज १५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ४८८, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १०४ (दोन्ही मिळून ५९२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४४ हजार ६५८ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.३९ टक्के आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ७१८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज तीन हजार १२५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार १०७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४०९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३८ हजार ४०६ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८६.०० टक्के आहे.

जिल्ह्यात पूर्वीच्या २ आणि आजच्या १३ अशा १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ५३४ झाली आहे. मृत्युदर ३.४३ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४५०, खेड १४७, गुहागर १३६, दापोली १२३, चिपळूण २९५, संगमेश्वर १७८, लांजा ८२, राजापूर १११, मंडणगड १२. (एकूण १५३४).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply