सिंधुदुर्गात करोनामुक्तांच्या संख्येतील वाढ कायम

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट, तर करोनामुक्तांच्या संख्येत वाढ आजही कायम राहिली. जिल्ह्यासाठी हे आणखी दिलासादायक आहे.

आज, ७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४२४ आणि एकूण ३८ हजार ३९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या ८ जणांसह नवे ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले. एकूण बाधितांची संख्या आता ४३ हजार ७३१ झाली आहे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ४ हजार ५९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४५, दोडामार्ग – ६, कणकवली – ४६, कुडाळ – ८८, मालवण – ४७, सावंतवाडी – ४०, वैभववाडी – ४, वेंगुर्ले – २६.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६८८, दोडामार्ग १३२, कणकवली ६५५, कुडाळ १००५, मालवण ९७९, सावंतवाडी ५२८, वैभववाडी १९८, वेंगुर्ले ३८९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी २२१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०९५ झाली आहे. आज नोंद झालेल्या ६ आणि आधी मरण पावलेल्या आणि आज नोंद झालेल्या ३ मृतांचा तपशील असा – कणकवली २, कुडाळ ४, मालवण ३.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १४३, दोडामार्ग – ३२, कणकवली – २२०, कुडाळ – १६८, मालवण – २२६, सावंतवाडी – १५१, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ८१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ७.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply