रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांच्या संख्येत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (७ जुलै) ४२९ नवे करोनाबाधित आढळले, तर त्याहून अधिक म्हणजे ४८६ रुग्ण करोनामुक्त झाले. सलग चौथ्या दिवशी करोनामुक्तांची संख्या ४०० हून अधिक आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – ११६, अँटिजेन चाचणी – १६३ (एकूण २७९). आधी नोंद न झालेल्या १५० रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ४२९ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६५ हजार २४ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ८.४६ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १३.७० टक्के आहे.

आज चार हजार ९०५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात दोन हजार २०८ गृह विलगीकरणात, दोन हजार ६९७ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ६१९ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज पाच हजार ४८५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख १६ हजार ८२४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४८६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५७ हजार ६६७ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८९.०२ टक्के आहे.

जिल्ह्यात कालच्या २ आणि आजच्या ६ अशा एकूण ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८३३ झाली आहे. मृत्युदर २.८२ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५९८, खेड १७१, गुहागर १३८, दापोली १५८, चिपळूण ३५७, संगमेश्वर १६९, लांजा ९४, राजापूर १०७, मंडणगड २७. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८३३).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply