रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (९ जुलै) एकाच दिवशी एक हजार ३५ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांच्या तुलनेत नवबाधित (४०१) कमी आहेत, मात्र २३ मृतांची आज नोंद झाली.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १९८, अँटिजेन चाचणी – २०३ (एकूण ४०१). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६५ हजार ८५० झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.४६ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १३.५८ टक्के आहे.
आज चार हजार ३९३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ८५६ गृह विलगीकरणात, दोन हजार ५३७ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ६९१ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज चार हजार ९७२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख २६ हजार ४४५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज एक हजार ३५ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५८ हजार ९०६ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८९.७९ टक्के झाली आहे.
जिल्ह्यात कालच्या २१ आणि आजच्या २ अशा २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८६० झाली आहे. मृत्युदर २.८२ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६०५, खेड १७२, गुहागर १३९, दापोली १६०, चिपळूण ३६०, संगमेश्वर १७२, लांजा ९९, राजापूर ११२, मंडणगड २७. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८६०).

