सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ९८ रुग्ण करोनामुक्त झाले असून करोनामुक्तांची एकूण संख्या ४१ हजार ८३८ झाली आहे.

आज जिल्ह्यात नवे १९४ करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४६ हजार १९८ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ३ हजार १८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ११, दोडामार्ग – ३, कणकवली – ४८, कुडाळ – ५८, मालवण – २८, सावंतवाडी – २५, वैभववाडी – १, वेंगुर्ले – १८, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४४२, दोडामार्ग ८७, कणकवली ६१३, कुडाळ ७४७, मालवण ५१०, सावंतवाडी ३८३, वैभववाडी १३६, वेंगुर्ले २५४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १७. सक्रिय रुग्णांपैकी १९६ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आधीच्या ४ आणि आजच्या २ अशा ६ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १६९ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – कणकवली १, मालवण १, सावंतवाडी ३, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५३, दोडामार्ग – ३४, कणकवली – २३५, कुडाळ – १७७, मालवण – २४१, सावंतवाडी – १५९, वैभववाडी – ७०, वेंगुर्ले – ९४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply