रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ जुलै) करोनाचे नवे ३८१ रुग्ण आढळले, तर ३०४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९१.७७ झाली आहे. जिल्ह्यात आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६८ हजार ३२३ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा एकूण रुग्णवाढीचा दर १३.०८ टक्के आहे.
आज तीन हजार २५२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ५०७ गृह विलगीकरणात, तर एक हजार ७४५ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ४२८ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज चार हजार ६६५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ६० हजार ८४३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात ३०४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६२ हजार ७०२ झाली आहे.
जिल्ह्यात यापूर्वीच्या ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९४१ झाली आहे. मृत्युदर २.८८ टक्के आहे. विशेष म्हणजे आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६४०, खेड १७५, गुहागर १४४, दापोली १६९, चिपळूण ३७४, संगमेश्वर १७६, लांजा १०१, राजापूर ११९, मंडणगड २९. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९४१).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
