रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २१८ रुग्ण, १८० करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ जुलै) करोनाचे नवे २१८ रुग्ण आढळले, तर १८० रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९१.७४ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – ६९, अँटिजेन – १४९ (एकूण २१८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६८ हजार ५४३ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ५.२७ टक्के, तर एकूण रुग्णवाढीचा दर १३.०२ टक्के आहे.

आज तीन हजार ४९६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ७४७ गृह विलगीकरणात, तर एक हजार ७४९ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी २१३ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.

आज तीन हजार ९१५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ६४ हजार ७५८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात १८० रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६२ हजार ८८२ झाली आहे.

जिल्ह्यात यापूर्वीच्या ६ आणि आजच्या ५ अशा ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९५२ झाली आहे. मृत्युदर २.८५ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६४२, खेड १७६, गुहागर १४५, दापोली १७२, चिपळूण ३७५, संगमेश्वर १७८, लांजा १०२, राजापूर ११९, मंडणगड २९. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९५२).
………….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply