रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१ ऑगस्ट) १८९ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६७ हजार ३१२ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.८५ झाली आहे. पूर्वीच्या ३ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली.
आज नवे २०२ करोनाबाधित रुग्ण आढळले. आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३६६८ नमुन्यांपैकी ३५७७ अहवाल निगेटिव्ह, तर ९१ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या २२६२ पैकी २१५१ अहवाल निगेटिव्ह, तर १११ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून २०२ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७१ हजार ७२५ झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख २१ हजार ३४२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज २२१७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १७९९, तर लक्षणे असलेले ४१८ रुग्ण आहेत. १११२ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६७२, डीसीएचसीमधील १८६, तर डीसीएचमध्ये २३२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १९७ जण ऑक्सिजनवर, ७२ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. यापूर्वीच्या ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. मृत्युदर २.९१ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २०८६ एवढी आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १७४९, तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७५६ आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८०, खेड १८४, गुहागर १५४, चिपळूण ३९७, संगमेश्वर १८३, रत्नागिरी ७०९, लांजा ११०, राजापूर १३८. (एकूण २०८६).
सिंधुदुर्गात आज तिघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (एक ऑगस्ट) १०७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत ४४ हजार ७७९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले असून, सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २४७३ आहे. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

