रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १५१ रुग्ण, १५८ रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ ऑगस्ट) १५८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६७ हजार ४७० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.८७ झाली आहे. आज नव्या १५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज नवे १५१ करोनाबाधित रुग्ण आढळले. आजच्या रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या चार हजार २१८ नमुन्यांपैकी चार हजार १३२ अहवाल निगेटिव्ह, तर ८६ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या एक हजार ७१३ पैकी एक हजार ६४८ अहवाल निगेटिव्ह, तर ६५ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून १५१ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७१ हजार ८७६ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख २७ हजार ११० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज दोन हजार १३९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ७१४, तर लक्षणे असलेले ४२५ रुग्ण आहेत. एक हजार ५१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६५२, डीसीएचसीमधील १८८, तर डीसीएचमध्ये २३७ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १९४ जण ऑक्सिजनवर, ६८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आजच्या ९ आणि यापूर्वीच्या ६ अशा एकूण १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील २.३२ हा मृत्युदर वाढून आज तो २.९२ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १०१ एवढी आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ७५९, तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७५७ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८०, खेड १८४, गुहागर १५४, चिपळूण ३९९, संगमेश्वर १८३, रत्नागिरी ७१९, लांजा ११२, राजापूर १३९. (एकूण २१०१).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply