रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांच्या संख्येत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ७१ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ४६ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ७३५ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.२९ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ४६ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३०८ नमुन्यांपैकी २८९ अहवाल निगेटिव्ह, तर १९ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १६२७ पैकी १६०० अहवाल निगेटिव्ह, तर २७ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार ३३२ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ७७ हजार ९६० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १००२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७०४, तर लक्षणे असलेले २९८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४८७ आहे, तर ५१५ जण संस्थात्मक विलगीकरणात असून २४० जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २१७, डीसीएचसीमधील १२७, तर डीसीएचमध्ये १७१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी २२० जण ऑक्सिजनवर, ७१ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज दोघा आणि आधीच्या एका अशा एकूण ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.९५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०९ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३५५ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१०, खेड २१३, गुहागर १६६, चिपळूण ४६०, संगमेश्वर २०४, रत्नागिरी ७८७, लांजा १२४, राजापूर १५६. (एकूण २३५५).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply