सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे नवे ६५ रुग्ण आढळले, तर २० रुग्ण करोनामुक्त झाले. या काळात चौघांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार दुबार लॅब तपासणी केलेल्या ३५ जणांसह आज नवे ६५ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार १६० झाली आहे.
जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ०, दोडामार्ग २, कणकवली ८, कुडाळ ६, मालवण ११, सावंतवाडी २, वैभववाडी ०, वेंगुर्ले १, जिल्ह्याबाहेरील ०.
जिल्ह्यात सध्या ११०० सक्रिय रुग्ण असून, सक्रिय रुग्णांपैकी ३८ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९८, दोडामार्ग २४, कणकवली १६८, कुडाळ २८८, मालवण १८६, सावंतवाडी १७६, वैभववाडी ३१, वेंगुर्ले ११७, जिल्ह्याबाहेरील १२.
आज झाराप (कुडाळ) येथील ६३ वर्षीय पुरुष, कळणे (दोडामार्ग) येथील ७५ वर्षीय पुरुष, कुडाळ येथील ३२ वर्षीय स्त्री आणि सोनवडे (कुडाळ) येथील ६५ वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला. सर्व रुग्णांना सहव्याधी होत्या. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४१३ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७६, दोडामार्ग – ४०, कणकवली – २९४, कुडाळ – २३६, मालवण – २७९, सावंतवाडी – १९२, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media