coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात आज फक्त एक नवा करोनाबाधित; १६ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ ऑक्टोबर) करोनाचा फक्त एक नवा करोनाबाधित रुग्ण आढळला, तर १६ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आता केवळ २०१ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवा १ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ८२० झाली आहे. आज १६ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार १४९ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.६१ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या सर्व ६५ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या २३६ नमुन्यांपैकी २३५ अहवाल निगेटिव्ह, तर एक पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ९९ हजार ९७७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज २०१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ११७, तर लक्षणे असलेले ८४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १०७ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात ९४ जण आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १०, डीसीएचसीमधील ४०, तर डीसीएचमध्ये ४४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ४४ जण ऑक्सिजनवर, १४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या एका मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.८७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४७० आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२०, खेड २२६, गुहागर १७२, चिपळूण ४७६, संगमेश्वर २१८, रत्नागिरी ८२४, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४७०).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply