सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकही रुग्ण चिंताजनक अवस्थेत नाही की कोणीही व्हेंटिलेटरवर नाही. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
आज (२२ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या २१ असून आतापर्यंत ५१ हजार ७४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २२६ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज आढळलेले दोन्ही रुग्ण दोडामार्ग तालुक्यातील आहेत. त्यामुळे दोडामार्ग तालुका पुन्हा एकदा करोनामुक्तीकडून करोनाबाधित झाला आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग २, कणकवली ८, कुडाळ २, मालवण ३, सावंतवाडी १, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.
एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६४ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media