रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २२ डिसेंबर) अनेक दिवसांनी नव्या करोनाबाधित रुग्णांची संख्या दोनआकडी झाली. आज ११ रुग्ण आढळले, तर ७ जण करोनामुक्त झाले. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या वाढून ३५ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १४९ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६२४ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८१ झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३५१ पैकी सर्व ३४७ निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ५१९ पैकी ५१२ नमुने निगेटिव्ह, तर ७ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ५४ हजार ४९८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३५ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १३, तर लक्षणे असलेले २२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १३, तर संस्थात्मक विलगीकरणात २२ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८, तर डीसीएचमध्ये १४ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. २ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९० एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१५ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७९, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९०).
लसीकरणाची स्थिती
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार आज (दि. २२ डिसेंबर) झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत १०२९ जणांनी पहिला, तर ४७८५ जणांनी दुसरा डोस घेतला. आज एकूण ५८१४ जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत जिल्ह्यातील १० लाख १ हजार ५८८ जणांचा पहिला, तर ६ लाख १६ हजार ४२६ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १६ लाख १८ हजार १४ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media