photo of person wearing protective wear while holding globe

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १ जानेवारी) करोनाच्या नव्या बाधितांमध्ये कालच्यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. आज नवे २९ रुग्ण आढळले, तर केवळ ५ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ८३ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार २२८ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६५४ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी घटून ९६.७५ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५५९ पैकी ५४० निगेटिव्ह, तर १९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ३४१ पैकी ३३१ नमुने निगेटिव्ह, १० पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ६२ हजार ३९३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ८३ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ५७, तर लक्षणे असलेले २६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३१, तर संस्थात्मक विलगीकरणात १३ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १५, तर डीसीएचमध्ये ११ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर ४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९१ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७९, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९१).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. ३१ डिसेंबर) झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत ९६२ जणांनी पहिला, तर ८,६२२ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण ९,५८४ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील १० लाख १० हजार २२ जणांचा पहिला, तर ६ लाख ७२ हजार ७४३ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १६ लाख ८२ हजार ७६५ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply