coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५६ करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ४ जानेवारी) करोनाचे नवे ५६ रुग्ण आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या १५७ झाली आहे. आज एका मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ३१२ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६६३ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आणखी घटून ९६.६६ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५८४ पैकी ५६४ निगेटिव्ह, तर २० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४७० पैकी ४३४ नमुने निगेटिव्ह, ३६ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ६४ हजार ४४० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १५७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ११२, तर लक्षणे असलेले ४५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ११२, तर संस्थात्मक विलगीकरणात ४५ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये २९, तर डीसीएचमध्ये २० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी १० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण दाखल नाही.

यापूर्वीच्या एका मृत्यूची नोंद आज झाली. तो रुग्ण चिपळूण तालुक्यातील आहे. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९२ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४८०, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९१).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. ३ जानेवारी) झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत २,४८८ जणांनी पहिला, तर ९,९२२ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण १२ हजार ४१० जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील १० लाख १३ हजार २०६ जणांचा पहिला, तर ६ लाख ८८ हजार १९८ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १७ लाख १ हजार ४०४ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply