रत्नागिरी जिल्ह्यात आज १३५ नवे करोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या ४८३

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ९ जानेवारी) करोनाचे नवे १३५ रुग्ण आढळले, तर ४२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या ४८३ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ८२७ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ७९६ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आणखी घटून ९६.२० झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ७० हजार ७५६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज आरटीपीसीआर टेस्टसाठी पाठवलेल्या ८२९पैकी ७७२ अहवाल निगेटिव्ह, तर ५७ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ७६५पैकी ६८७ अहवाल निगेटिव्ह, तर ७८ अहवाल पॉझिटिव्ह आले. सात जणांना कृत्रिम ऑक्सिजन सुरू असून, एक जण अतिदक्षता विभागात दाखल आहे. ५६ रुग्णांची नावे अद्याप पोर्टलवर दाखल करायची राहिली आहेत.

४८३ सक्रिय रुग्णांपैकी ३५३ रुग्ण लक्षणे नसलेले, तर १३० रुग्ण लक्षणे असलेले आहेत. गृह विलगीकरणात ३५३, तर संस्थात्मक विलगीकरणात १३० जण आहेत. डीसीएचसीमध्ये ५६, तर डीसीएचमध्ये ७४ रुग्ण उपचार घेत आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. सात रुग्णांना ऑक्सिजन सुरू असून, एक रुग्ण अतिदक्षता विभागात आहे.

आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९२ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४८०, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९२).

लसीकरणाचा वेग वाढला

जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. ८ जानेवारी) झालेल्या ८६ करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत ९७१७ जणांनी पहिला, तर २९१६ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण १२ हजार ६३३ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील १० लाख ४६ हजार ३८० जणांचा पहिला, तर ७ लाख २८ हजार ७१० जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १७ लाख ७५ हजार ९० जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply