सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाच्या रुग्णांची संख्या दीडशेच्या आकड्याकडे वाटचाल करू लागली आहे. आज नवे १४७ रुग्ण आढळले, तर केवळ १९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (१२ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या पाच जणांसह एकूण १४७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या ७०६ झाली आहे. त्यापैकी ७ रुग्ण ऑक्सिजनवर असून ३ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.
आतापर्यंत ५१ हजार ८०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार ९७९ रुग्ण बाधित आढळले. आतापर्यंत १ हजार ४६६ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ११, दोडामार्ग १६, कणकवली ३५, कुडाळ २६, मालवण १३, सावंतवाडी ३०, वैभववाडी ३, वेंगुर्ले ११, जिल्ह्याबाहेरील २.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ७७, दोडामार्ग ७२, कणकवली ११९, कुडाळ १५४, मालवण १०८, सावंतवाडी १००, वैभववाडी २३, वेंगुर्ले ४४, जिल्ह्याबाहेरील ९.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६६ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २८९, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media