रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १२ जानेवारी) करोनाचे नवे २८१ रुग्ण आढळले, तर ७७ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या ८०१ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८० हजार ३५७ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७७ हजार १९ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आणखी घटून ९५.८५ झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७०९ पैकी ५७५ निगेटिव्ह, तर १३४ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १३६३ पैकी १२१६ नमुने निगेटिव्ह, १४७ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ७४ हजार ९३० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ८०१ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ६४०, तर लक्षणे असलेले १६१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ६२९, तर संस्थात्मक विलगीकरणात १७२ जण आहेत. ४५ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ६३, तर डीसीएचमध्ये ९८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ११ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण दाखल नाही.
आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९२ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४८०, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९२).
लसीकरणाची स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात ११ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची १२७ सत्रं पार पडली. त्यात ६५९४ जणांनी लशीचा पहिला, तर ८२०३ जणांनी दुसरा डोस घेतला. एकूण १४,७९७ जणांचं लसीकरण ११ जानेवारीला पार पडलं. ११ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ३१ हजार ६५३ जणांचा पहिला, तर ७ लाख ४८ हजार २२५ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत.
जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ३० हजार ८३८ जणांनी लशीचा पहिला डोस घेतला असून, २१५८ जणांनी लशीचा बूस्टर अर्थात तिसरा डोस घेतला आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media