coronavirus

रत्नागिरीत १४२ नवे करोनाबाधित; १८२ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २६ जानेवारी) करोनाचे १४२ नवे रुग्ण आढळले. आज १८२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या ११७६ झाली आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८३ हजार ३१३ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७९ हजार ५६७ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.५० झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५५७ पैकी ४९४ निगेटिव्ह, तर ६३ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १०१३ पैकी ९३४ नमुने निगेटिव्ह, तर ७९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ९६ हजार ९८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ११७६ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ८९५, तर लक्षणे असलेले २८१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८३३ असून, संस्थात्मक विलगीकरणात ३४३ जण आहेत. एकूण ६५ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १३३, तर डीसीएचमध्ये १४८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ६२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात २ रुग्ण दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २५०५ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ०.५८ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. एकूण मृत्युदर ३.०१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२९, गुहागर १७७, चिपळूण ४८२, संगमेश्वर २२६, रत्नागिरी ८३३, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २५०५).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात २५ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ६३ सत्रे पार पडली. त्यात ३९१ जणांनी लशीचा पहिला, तर १९६१ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २३५२ जणांचे लसीकरण २५ जानेवारीला झाले. याशिवाय १५ ते १८ वयोगटातील २६० जणांनी लशीचा पहिला डोस घेतला. ६२० ज्येष्ठ नागरिकांनी तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेतला. २५ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४६ हजार ५१५ जणांचा पहिला, तर ८ लाख १२ हजार ९०५ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply